Translate

Wednesday, August 6, 2025

District Treasury Office Gondia

 

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

जिल्हा कोषागार  कार्यालय गोंदिया

जिल्हाधिकारी कार्यालय परीसर, पतंगा मैदान, आमगाव रोड, गोंदिया

 

जुन्या मुंबई राज्यातील कोषागारे महसूल विभागाकडून वित्त विभागाने दिनांक ०१ एप्रिल १९५५  पासून आपल्या नियंत्रणाखाली आणली. त्याचप्रमाणे महसूल विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेली विदर्भातील कोषागारे वित्त विभागाने दिनांक ०१ जानेवारी १९५८ पासून आपल्या नियंत्रणाखाली आणली.  महाराष्ट्र शासनाने वित्त विभागाच्या नियंत्रणाखाली १ फेब्रुवारी १९६२ पासून लेखा व कोषागारे संचालनालयाची स्थापना केली आणि कोषागाराचे तात्काळ नियंत्रण संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडे विभागप्रमुख या नात्याने सोपविण्यात आले.  कोषागाराप्रमाणेच तहसिल स्तरावरील २४ उपकोषागारांचा एक गट दिनांक   १ एप्रिल १९६४ रोजी आणि दिनांक १ जून १९६८ रोजी ९८ उपकोषागारांचा आणखी एक गट वित्त विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्यात आला. आता राज्यातील सर्व कोषागारे / उपकोषागारे वित्त विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असून संचालक लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई या विभागप्रमुखांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत.

गोंदिया जिल्हयाकरीता गोंदिया येथे १ जिल्हा कोषागार कार्यालय आणि जिल्हायातील ८ तालुकास्थित प्रत्येक तालुक्यासाठी १ मिळून  ७ उपकोषागार कार्यालये कार्यान्वयीत आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या लोकाभिमूख प्रशासन या धोरणास अनुसरुन कोषागार/ उपकोषागार अंतर्गत  वित्त विषयक माहिती व कार्यान्वयीत असलेले कामकाज हे या ब्लॉगद्वारे सर्व नागरीकांस अवलोकीत करण्यास आम्हांस आनंद होत आहे.

धन्यवाद....

 

District Treasury Office Gondia

  महाराष्ट्र शासन वित्त विभाग जिल्हा कोषागार  कार्यालय गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परीसर , पतंगा मैदान , आमगाव रोड , गोंदिया   ज...